‘.तर आज राज ठाकरे सुद्धा मुसलमान असते’; रामदास आठवलेंच्या या विधानाने खळबळ

 

राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वाचा मुद्दा गाजत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेने अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर यावरून राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. मात्र रिपाईचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले सुरूवातीपासूनच राज ठाकरेंच्या या भूमिकेच्या विरोधात दिसत आहेत.

‘एका बाजूला भोंगे दुसऱ्या बाजूला सोंगे’, असं म्हणत आठवलेंनी राज ठाकरेंना यापूर्वीही टोला लगावला होता. त्यानंतर रामदास आठवलेंनी आणखी एकदा राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आम्हाला अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज जर मोगलांविरूद्ध लढले नसते तर राज ठाकरे सुद्धा आज कदाचित मुसलमान असते, असं मोठं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे.

दरम्यान, रामदास आठवलेंच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे आठवलेंच्या टीकेला मनसे काय प्रत्युत्तर देणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.यापूर्वी सुद्धा रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांचयव्हर गंभीर टीका केली होती भाजपा आणि मनसेच्या सुरु असलेल्या युतीवर भाष्य करत ही युती न होण्याचे संकेत त्यांनी दिले होते.

Team Global News Marathi: