जसे बाळासाहेबांचे व्हिडीओ बनवून सभेला गर्दी वाढवण्याचा प्रयत्न करता तसा……., मनसेने लगावला टोला

 

मुंबई | १४ मे रोजी उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत. “आता सभेला तर सुरुवात झालेलीच आहे, १४ तारखेला तर मी सभा घेतोच आहे, पण ही सभा म्हणजे उठसूठ इकडे वार तिकडे वार असं नाही करणार, जे काय माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. माझं काही तुंबलेलं नाही, पण मनामध्ये ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत,” असं उद्धव ठाकरे एका सभेदरम्यान म्हणाले होते.

दरम्यान, शिवसेनेनं या सभेपूर्वी काही व्हिडीओदेखील शेअर केले आहेत. तसंच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसह हिंदुत्वाचा खरा विचार ऐकायला यायलाच पाहिजे असं त्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावरून मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “जसे बाळासाहेबांचे व्हिडीओ बनवून सभेची गर्दी वाढविण्याचा केविलवाणा प्रयत्न करता तसाच बाळासाहेबांची भोंग्याची भूमिका पण प्रत्यक्षात उतरवा…..कळू दे की जनतेला एकदाचे तुमचे कडवे हिंदुत्व.!,” असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला.

मुंबई महापालिकेच्या सर्वांसाठी पाणी या नवीन धोरणाचे कौतुक आहे. हे पाणी मिळणे म्हणजे अधिकृत असण्याचा पुरावा नाही तर ही माणुसकी आहे. हक्काचे पाणी मिळाले पाहिजे म्हणून ही योजना आहे, असे सांगत आता सभा सुरू होत आहेत. १४ तारखेला सभेत जे मनात आहे ते मी बोलणार असेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केले होते.

Team Global News Marathi: