स्वप्नील लोणकर आत्महत्या प्रकरणी मनसे विधानभवनावर धडकणार |

 

मुंबई | MPSC परीक्षा उत्तेरण होऊन सुद्धा नोकरी न मिळाल्यामुळे आणि आर्थिक परिस्थितीमुळं स्वप्निल सुनील लोणकर या तरुणानं आत्महत्या केल्याने एकचं खळबळ उडाली होती. तसेच राज्यातील वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले होते. या घटनेमुळे विरोधक सत्ताधाऱ्यांवर आक्रमक झाले आहेत.

याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून ठाकरे सरकारचा निषेध करण्यासाठी मनसैनिक विधानभवनावर धडकणार आहेत. मनसेचे नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे आपल्या कार्यकर्त्यांसह आज वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करुन विधानभवनाच्या दिशेने निघाले आहेत. पायी निघालेल्या या मोर्च्यामध्ये मनसेचे १५० ते २०० कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने नैराश्यात गेलेल्या स्वप्निल लोणकर या तरुणाने पुण्यात राहत्या घरी आत्महत्या केली. पुण्यात त्याने गळफास घेतला. आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्नीलने एक पत्र लिहिले होते, ज्यात परीक्षा पास होऊनही नोकरी मिळत नसल्याने होत असलेल्या वेदनांना वाट मोकळी करुन दिली.

Team Global News Marathi: