मुंबई | अभिनेता अमिताभ बच्चन काही कारणास्तव नेहमीच चर्चेत असतात. सध्या त्यांच्या घराजवळ झळकत असलेल्या बँनरबाजीमुळे ते सध्या जास्तच चर्चेत असलेले दिसून येत आहे. बच्चन यांच्या जूहू येथील ‘प्रतिक्षा’ बंगल्यासमोरचं बॅनर तूर्तास सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हे बॅनर लावण्यात आले असून महानायक आहात, जरा मनाचा मोठेपणा दाखवा, अशा आशयाच्या या बॅनरची सध्या मुंबईत जोरदार चर्चा सुरु झाली आहे. अमिताभ यांचा ‘प्रतीक्षा’ हा बंगला संत ज्ञानेश्वर मार्गावर आहे आणि मुंबई महानगर पालिका या मार्गाचे रूंदीकरण करण्याच्या तयारीत आहे.
पण यात एक अडचण आहे. मार्गाच्या रूंदीकरणासाठी अमिताभ यांच्या बंगल्याची एक भींत तोडावी लागणार आहे.
तसेच या तोडफोड प्रकरणी अमिताभ बच्चन यांनी कोर्टाचे दार ठोकले आहे. तसेच मनपाच्या कारवाईला आव्हान दिले आहे. कॉलेज, शाळा, हॉस्पिटल असलेल्या या मार्गावर अमिताभ यांच्या ‘प्रतिक्षा’ बंगल्यामुळे अडचण होत आहे. त्यामुळे आम्हाला अमिताभ बच्चन यांच्या मोठेपणाची प्रतिक्षा आहे, अशा आशयाचं बॅनर मनसेकडून लावण्यात आलं आहे.