राज्यात ऍडव्हेंचर टुरिझम धोरणाला मान्यता, मंत्री आदित्य ठाकरे यांचा पुढाकार |

 

मुंबई | आता युरोपातील देशांप्रमाणे बलून सफारी, पॅरामोटरिंग, स्काय डायव्हिंगचा थरार अनुभवता येणार आहे. वॉटरस्पोर्टस्, ट्रेकिंग, कॅम्पिंग, त्याशिवाय ऑल टेरेन व्हेइकल अशा खेळांचाही साहसी पर्यटकांना लवकरच आनंद लुटता येईल.

राज्यात जमीन, आकाश व पाण्यातील साहसी क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या साहसी पर्यटन धोरणाला बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या धोरणासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी यामध्ये २५ प्रकारच्या साहसी खेळांचा समावेश आहे.

या खेळामध्ये ट्रेकिंग, रॅपलिंग, रॉक क्लायंबिग, रिव्हर क्रॉसिंग, बाईकिंग(सायकल) ऑल टेरने व्हेईकल अशा खेळांचा समावेश आहे. जंगलात तंबू टाकून रात्रीच्या वेळेस वास्तव्य करण्यासाठी कॅम्पिंग याबरोबरच स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्पेलिंग, पॅरासेलिंग, जेट स्की, स्पीड बोट, वॉटर स्कूटर, रिव्हर राफ्टिंग अशा पाण्यातील साहसी क्रीडा प्रकारांचाही समावेश आहे.

राज्यात पॅराग्लायडिंगचा सुरू केले होते; पण बलून सफारी व स्काय डायव्हिंग प्रथमच अनुभवता येणार आहे. हेलिकॉप्टर किंवा छोटय़ा आकाराच्या विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने खाली झेपावण्याचा प्रकार परदेशात प्रचंड लोकप्रिय आहे. हजारो फूट उंचीवरून पॅराशूटच्या सहाय्याने खाली येण्याचा थरार राज्यातील साहसी पर्यटकांना अनुभवता येईल, अशी माहिती राज्याच्या पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी यानिमित्ताने दिली.

Team Global News Marathi: