एसटी कर्मचारी संपाला ब्रेक लागणार का? आजच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

 

मुंबई | एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी मागच्या अनेक महिन्यापासून संपूर्ण राज्यभरातील एसटी कर्मचारी आंदोलन करत असून अद्याप या आंदोलनातून तोडगा निघालेला नाहीये मात्र दुसरीकडे या आंदोलनामुळे सामान्य प्रवाशांचे हाल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण, संपावर तोडगा काढण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे. या अहावालावर आज मुंबई उच्च न्यायलयात सुनावणी होणार आहे. विलिनीकरणासंदर्भात आपल्या बाजूने निकाल लागला नाही तर आंदोलन चिघळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

विलिनीकरणाबााबत समितीच्या अहवालात नेमक्या काय शिफारशी आहेत? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या सुनावणीनंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटणार का? कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचे ठरणार आहे. संपचा तिढा कायम असताना आज न्यायालयात काय निर्णय होणर याकडे कामगारांबरोबरच प्रवाशांचे देखील लक्ष लागले आहे.

Team Global News Marathi: