सपासप असा कोयताच आवाज काळीज चिरत जातो वाटते हे वार कोबीवर होत नसून आपल्याच छातीवर होत आहे – राजू शेट्टी

कोल्हापूर : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना लॉकडाऊनची तयारी करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे पडसाद आता सर्वत्र उमटताना दिसत आहे. मात्र एकीकडे लोकडाऊनची घोषणा होत असताना शेतात पिकवलेल्या फळभाज्यांवर आलेल्या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

यावर आता शेतकऱ्यांची थोडक्यात व्यथा मांडणारे ट्विट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी मांडले आहे. “लॉकडाउन होणार या भीतीने भाजीपाला बाजारभाव पडले असून शेतकरी शिवारातच भाजीपाला काढून टाकत आहे. सपासप असा कोयताच आवाज काळीज चिरत जातो वाटते हे वार कोबीवर होत नसून आपल्याच छातीवर होत आहे” असे ट्विट त्यांनी केले आहे.

राजू शेट्टी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये शेतकरी शेतातील कोबीचं पीक काढून टाकताना दिसत आहेत. राजू शेट्टी यांनी त्या व्हिडीओला एक कॅप्शन दिलं आहे. लॉकडाऊनच्या भीतीने भाजीपाला बाजारभाव पडले असून शेतकरी शिवारातच भाजीपाला काढून टाकत आहे. सपासप असा कोयत्याचा आवाज काळीज चिरत जातो, वाटते हे वार कोबीवर होत नसून आपल्याच छातीवर होत आहे, अशा आशयाचं ट्विट राजू शेट्टी यांनी केले आहे.

Team Global News Marathi: