सोलापूर – खुनेश्वरच्या शेतकऱ्याचा जुगाड ; चाळीस हजारात तयार केला ‘नंदी ब्लोअर’

सोलापूर – खुनेश्वरच्या शेतकऱ्याचा जुगाड ; चाळीस हजारात तयार केला ‘नंदी ब्लोअर’

मोहोळ – सोलापूर मधील मोहोळ तालुक्यातील खुनेश्वर गावातील तरुण शेतकरी ज्ञानेश्वर हरीदास चव्हाण यांनी स्वतःच्या कल्पना शक्तीचा वापर करीत जुगाड करत केवळ ४० हजारात फवारणीसाठी ‘नंदी ब्लोअर’ तयार केला आहे.

दोन वर्षापूर्वी चव्हाण यांनी दोन एकर द्राक्षे लागवड केली होती. मात्र बागेत फवारणीसाठी मजूरामार्फत फवारणी मुळे मोठा खर्च होत होता. सोबतच वेळ ही जास्त लागत होता. यामुळे मोटारसायकलच्या जुन्या चाकांचा वापर आणि लोखंडी अँगलचा वापर करीत केवळ पाच हजारात गाडा तयार केला.

यावर पाठीमागील बाजुस एसटीपी पंप बसवला, त्यापुढे 5 एचपीचा डिझेल इंजिन आणि त्यापुढे दोनशे लिटर क्षमतेचा आडवा बॕरल (पिंप) बसवला, २० एमएम ड्रीपच्या नळ्यांचा वापर केला. बाजारातून खरेदीकरुन फवारणीसाठी दोन्ही बाजुला चार- चार स्प्रे गन बसवले.सर्वात पुढे एक बैल (नंदी) जुंपण्यासासाठी व्यवस्था केली.

या सर्व यंत्र सामुग्री आणि साहित्यासाठी चाळीस हजार खर्च आला. या जुगाडामुळे ट्रॕक्टर, ब्लोअर साठी किमान पाच लाख खर्चावे लागतात.मात्र ज्ञानेश्वर चव्हाण यांनी ट्रॅक्टर आणि ब्लोअरच्या तुलनेत दहापट कमी खर्चात केलेला जुगाड अल्पभूधारक शेतकऱ्यांना वरदानच म्हणावे लागेल.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: