बंगालमध्ये अचानक कंडोमची मागणी वाढली, वकाचा काय आहे कारण

 

पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूर भागात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तेथील तरुणांमध्ये नशा करण्याचा विचित्रच ट्रेंड सुरु झाला आहे.नशेसाठी हे तरुण कंडोमचा वापर करत आहेत. जेव्हा मेडिकलवाल्याने कंडोम घेण्यासाठी वारंवार येणाऱ्या तरुणाला कारण विचारले तेव्हा त्यालासुद्धा ते कारण ऐकून धक्का बसला होता.

या प्रकारामुळे तेथील मेडिकल दुकानांमध्ये कंडोमच उरलेले नाहीत. या भागात फ्लेवर्ड कंडोमची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे प्रशासन देखील चिंतेत आले आहे. हे नशेचे लोन आता दुर्गापूरच्या आजुबाजुच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरू लागले आहे. या भागात देखील कंडोम दुकानांत उपलब्ध नाहीत.

मीडिया रिपोर्टनुसार कंडोमची अचानक मागणी वाढल्याने मेडिकल दुकानदारही चक्रावून गेले होते. एका दुकानदाराने वारंवार येणाऱ्या तरुणाला याचे कारण विचारले असता त्याने नशेसाठी नेत असल्याचे सांगितले. या कंडोमचा जो वास येतो त्याची हे तरुण वाफ घेतात. अनेक तरुण नशा करण्यासाठी याचा वापर करत असल्याचे त्या तरुणाने दुकानदाराला सांगितले. यावर नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनमध्ये एक रिसर्चही छापून आला आहे.

जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार कंडोममध्ये सुगंधी संयुगे असतात. हे सुगंधी संयुगे वितळल्यानंतर अल्कोहोल तयार करतात. याचे व्यसन कोणालाही लागू शकते. कंडोम गरम पाण्यात जास्त उकळल्यास त्यात असलेली सुगंधी संयुगे तुटून पाण्यात मिसळतात आणि हे पाणी एक प्रकारचे नशेचे द्रव्य बनते. या पाण्याची वाफ तरुण श्वासावाटे घेत असल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 31 जुलैला मराठवाड्यात;  संभाजीनगर जिल्ह्याचा करणार दौरा

 निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात शिवसेनेने उचलले पाऊल

Team Global News Marathi: