म्हणून त्या एका घटनेनंतर माधुरीने गोविंदासोबत सिनेमे करणे टाळलेच

म्हणून त्या एका घटनेनंतर माधुरीने गोविंदासोबत सिनेमे करणे टाळलेच

माधुरी दीक्षितची रुपेरी कारकीर्द आहे ३६ वर्षांची, तर गोविंदाची आहे ३४ वर्षांची! या अवधीत त्यांनी किती चित्रपटात एकत्र भूमिका साकारल्या?

माधुरी दीक्षितची रुपेरी कारकीर्द आहे ३६ वर्षांची, तर गोविंदाची आहे ३४ वर्षांची! या अवधीत त्यांनी किती चित्रपटात एकत्र भूमिका साकारल्या? पाप का अंत, इज्जतदार आणि महासंग्राम या मोजून तीन चित्रपटांत ते नायक-नायिका होते. तर बडे मियाँ छोटे मियाँमध्ये माधुरीने अमिताभ बच्चनसोबत डान्स करायला मिळतोय म्हणून ‘मखणा’ गाण्यात पाहुणी कलाकार म्हणून नृत्य केले, त्या गाण्यात गोविंदाही आहे.

इतक्याच कमी प्रमाणात हे दोघे एकत्र का आले? गोविंदाने नीलम, सोनम, मंदाकिनी, किमी काटकर, शिल्पा शिरोडकर यांच्यासोबत चित्रपट स्वीकारण्याचा झपाटा लावला. तर माधुरीने अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, संजय दत्त, सलमान खान, ऋषी कपूर यांच्याशी जोडी जमवली. या पलीकडे हे दोघेही जात होते किंवा गेले होते, पण तेव्हा हे दोघे एकत्र येत नसत.

गोविंदा जुही चावला इत्यादींसोबत  तर माधुरी शाहरूख खान इत्यादींसोबत काही चित्रपट स्वीकारायची. त्याचं काय झालं माहितीये? एकदा त्यांच्या एका चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्दीचा भाग म्हणून या दोघांच्या एका स्वतंत्र फोटो सेशनचे ठरले. दोघेही आपापल्या चित्रपटात प्रचंड बिझी म्हणून दोघांची ‘डेट’ मिळणे आणि जुळणे अवघड होते.

अखेर एक दिवस निघाला. गोविंदा वेळेपेक्षा शक्य तितक्या उशिरा का होईना पण येतो हे संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला माहिती असल्याने माधुरीनेही सावकाशीने आपली तयारी केली. मेकअप करून ती तयार झाली तरी गोविंदा आला नाही येथपर्यंत ठीक हो. पण दोन तास झाले, तीन तास झाले, त्याची वाट ती किती पाहायची?

त्या काळात मोबाईल जाऊ दे पेजरही आला नव्हता आणि एकदा का कोणी घराबाहेर पडले असेल तर घरी फोन करून फारसा उपयोग नसे. अखेर कंटाळून माधुरी निघून गेली. अर्थात, हे फोटो सेशन राहून गेले, पण नंतर काही महिन्यांनी  शूटिंगच्या वेळी सेटवर तो भेटला तेव्हा तो असे काही घडलेच नाही अशा थाटात वावरला.

माधुरीला या सगळ्याचा राग आला आणि ‘पुन्हा गोविंदासोबत चित्रपट नकोच ‘ असे जणू तिने ठरवूनच टाकले. अशा गोष्टी अजिबात लपून राहत नाहीत, त्यांची चर्चा रंगते आणि गॉसिप्स मॅगझिनमधून हे सगळे तिखटमीठ लावून आलेच आणि मग ते सगळीकडे पसरायला वेळ तो काय लागतो?

ग्लोबल न्युज नेटवर्क: