सुरवात तुम्ही केली शेवट आम्ही करणार, ईडी कारवाईवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

सुरवात तुम्ही केली शेवट आम्ही करणार, ईडी कारवाईवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

ग्लोबल न्यूज: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचनालयाने सकाळी धाड टाकली आहे. आमदार सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकण्यात आला आहे. तसेच त्यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विंहग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचे पथक पोहोचले आहे यावर आता शिवसेना नेते आणि कसदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.


ईडीने राजकीय पक्षाच्या शाखेप्रमाणे वागू नये. आम्ही कोणालाही घाबरत नाही. हे सरकार आणि आमदार कोणाला शरण जाणार नाही. सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाहीविरोधात दिली.

सरनाईक हे सरनाईक हे स्वत: बांधकाम व्यावसायिक आहेत. ते शिवसेनेचे प्रवक्ता असून गेले ते शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. केंद्रात भाजपची सत्ता असल्याने भाजप ईडी सारख्या संस्थांचा वापर करुन भाजपविरोधात बोलणाऱ्या नेत्यांचे तोंड गप्प करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: