मोदी सरकारमुळेच मुंबई तुंबली अन् हिंदमाता येथे पाणी साचलंय त्याला स्मृती इराणी जबाबदार – राहुल शेवाळे

मुंबई | मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी साचून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. याच मुद्द्यावरून मुंबई महानगर पालिकेत विरोधी बाकावर बसलेल्या भारतीय जनता पक्षाने या मनपात सत्तेत बसलेल्या शिवसेना पक्षाला जबाबदार ठरवत टीका केली आहे. आता या टीकेला शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्र सरकारमुळे मुंबई तुंबली, असा दावा केला आहे. ते आज प्रसार माध्यमांशी बोलत होते.

केंद्र सरकारच्या दिरंगाईमुळेच मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरु झाल्यानंतर हिंदमाता, माटुंगा, सायन (शीव) आणि दादर भागात पाणी साचत आहे. हिंदमाता येथे पाणी साचण्यासाठी भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी जबाबदार आहेत, असं खासदार राहुल शेवाळे यांनी म्हणत केंद्र सरकारला टोला लगावला आहे.

तीन महिन्यांपासून हिंदमाता येथील अंडरग्राऊंड ड्रेनेज टनलची परवानगी मागितली जात होती. मात्र ही परवानगी उशीरा आल्याने हे काम होऊ शकलं नाही. परिणामी हिंदमाता परिसरात पाणी साचत असल्याचा आरोप राहुल शेवाळे यांनी केला आहे. मुंबई आणि उपनगराच्या परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. आज पहाटेपासूनच मुंबईत जोरदार पाऊस कोसळत आहेत. मात्र गेल्या काही तासांमध्ये ढगांचा गडगडाट आणि पावसाचा जोर वाढलाय. मुंबईत पावसानं जोर धरला असून पुढील तीन तास अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

Team Global News Marathi: