त्यांचा वाघ पिंजऱ्यात आहे, हे आता संजय राऊत यांनीही मान्य केलं चंद्रकांत पाटलांचा पलटवार

पुणे | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून २५ वर्ष जुन्या मित्र पक्षाने चांगल्याप्रकारे विरोधी पक्षाची भूमिका निभावलेली दिसून येत आहे. त्यात आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी विरोधक सोडताना दिसून येत नाही. शिवसेनेसोबत असलेली युती तुटल्यापासून या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप किंवा टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दोन्ही पक्षांमधील वाद कोरोना संसर्गाच्या काळातही सुरूच आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात वाघ शब्दावरुन चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर दोस्तीवरुन शाब्दीक कुस्ती करताना दिसत आहेत. आता, वाघ पिंजऱ्यात असो की जंगलात, तो वाघच असतो. हिंमत असेल तर वाघाशी मैत्री करायला पिंजऱ्यात या, महाराष्ट्रात वाघाचे राज्य आहे, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला होता.

संजय राऊतांच्या या विधानावर आता चंद्रकांत पाटील यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. किमान संजय राऊत यांनीही हे मान्य केलं की, त्यांचा वाघ हा पिंजऱ्यामध्ये आहे, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते आज सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या ठिकाणी बोलत होते. आता चंद्रकांत पाटील यांच्या टिकेला संजय राऊत काय उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: