पिकविम्यासाठी शेतकरी संघटनेचे पुण्यातील विमा कंपनीच्या कार्यालयात झोपा व मुक्काम आंदोलन

पिकविम्यासाठी शेतकरी संघटनेचे पुण्यातील विमा कंपनीच्या कार्यालयात झोपा व मुक्काम आंदोलन

बार्शी: राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकविमा भरपाईसाठी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज(गुरुवारी) कोरोनाच्या नियमांचे पालन करत पुणे येथे ढोले पाटील मार्गावरील भारती एक्सा कंपनीच्या राज्यस्तरीय कार्यालयात बेमुदत झोपा व मुक्काम आंदोलन सुरू करण्यात आले.

मागील आंदोलनात दहा दिवसात राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खातेवर रकमा सोडण्याचे लेखी आश्वासन दिले होते परंतु अजूनही अनेक शेतकरी वंचित असल्यामुळे आज पुन्हा ठरल्याप्रमाणे हे आंदोलन सुरू केल्याचे सांगून जोपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खातेवर क्लेमप्रमाणे पैसे सोडल्याचे मेसेज येत नाहीत तोपर्यंत हे बेमुदत आंदोलन सुरू राहणार असल्याचे शंकर गायकवाड यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

 

त्यावेळी दयानंद चौधरी, गोटू पाटील, अरविंद चौधरी, बजिरंग चौधरी, नितीन कदम, बाजीराव चौधरी, श्रीहरी गायकवाड, सिध्दार्थ चौधरी, समाधान आगलावे, अखबर शेख, राजाभाऊ कदम, अतुल गरड, गोपाळ पाडुळे, अतुल भोस्कर, तानाजी उकिरडे, पांडुरंग घेमाड, प्रविण घेमाड, हनुमंत राऊत, दत्ता भोगे, विनायक घोडके, ज्ञानेश्वर पाटील, लालासाहेब गायकवाड, दत्तात्र्य पाटील, संतोष गुंड, रूषिकेश गायकवाड, चंद्रहास गायकवाड, दिपक गायकवाड आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: