रश्मी शुक्लाच्या बचावासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते मैदानात, दरेकर म्हणाले की

मुंबई : राज्यात फोन टॅपिंग प्रकरण चांगलेच गाजत असताना आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांनी आणखी एका गंभीर आरोप केला होता. रश्मी शुक्ला यांनी अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांना भाजपसोबत राहण्यासाठी धमकावले होते, असे आव्हाड यांनी म्हटले होते. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी ट्विट करुन हा आरोप केला होता.

आता रश्मी शुक्ला यांच्यावर होत असलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते मैदानात उतरले आहे. ठाकरे सरकार चौकशीची भाषा करुन रश्मी शुक्ला यांच्यावर दबाव निर्माण करु पाहत आहे, असा आरोप भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. तसेच सरकार चौकशीची इतकी घाई का करत आहे? सरकारने प्रथम पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटची चौकशी करावी अशी मागणी दरेकर यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार मद्यमांशी बोलत होते.

पुढे बोलताना दरेकर म्हणाले की, रश्मी शुक्ला यांनी अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांना धमकावल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. मात्र, मला आव्हाडांचे वक्तव्य म्हणजे राजेंद्र यड्रावकर यांचे अवमूल्यन वाटते. कुठलाही आमदार नेता अशाप्रकारे दबावाला बळी पडत नसतो. एवढा कमकुवत लोकप्रतिनिधी नसतो. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांच्या बोलण्यात तथ्य वाटत नाही, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले.

Team Global News Marathi: