मातोश्रीवर बसून तुम्हाला काय कळणार लॉकडाऊन काय असतं…? भाजपचा टोला

मुंबई : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याची शक्यता निर्माण झाली असून सर्वसामान्य नागरिक, लघु उद्योजक आणि गरीब वर्गामध्ये यामुळे चिंता पसरली आहेत तसेच भीतीचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळत आहे.

यासंदर्भात महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाच्या आनंद महिंद्रा यांनी राज्यातील ठाकरे सरकारला एक महत्त्वाचा सल्ला दिला होता. आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी पुन्हा लक्ष केंद्रित करूया आणि मृत्यू टाळूया, असा महत्त्वाचा सल्ला महिंद्रा यांनी दिला होता. यानंतर आता भाटिया जनता पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘उद्धव ठाकरे तुमच्या नाकर्तेपणामुळे सामान्य जनतेला बळीचा बकरा ठरवू नका…! मातोश्रीवर बसून तुम्हाला काय कळणार लॉकडाऊन काय असतं? तुमचे निर्बंध, नियमांमध्ये पोळणाऱ्या जनतेला विचारा लॉकडाऊनमध्ये जगता येईल काय…? कधी हे जाणून घेतलंत का, मुख्यमंत्रीसाहेब…?’ असे म्हणत भाजपाने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

भाजपनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरू आनंद महिंद्रा यांच्या सल्ल्याचा संदर्भ देत त्यांच्यावर टीका केली. ‘लॉकडाऊनच्या पांघरूणाखाली अपयश लपवू नका ठाकरे सरकार, राज्यात कोणाचंही भविष्य उद्ध्वस्त करू नका. तुमच्या नाकर्तेपणानं कोणालाही बळी पडू देऊ नका,’ असेही भाजपाने म्हटलं आहे.

Team Global News Marathi: