सीतेच्या भूमिकेसाठी 12 कोटी मानधन घेतल्याच्या आरोपावर करिनाने दिलं स्पष्टीकरण

 

बॉलिवूडचा बहुप्रतीक्षित सिनेमा ‘लाल सिंग चड्ढा’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. पण त्यापूर्वीच या चित्रपटातील कलाकारांना टीकेला सामोरे जावे लागत आहे. बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान बहुप्रतिक्षित ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सध्या ती लाल सिंग चढ्ढाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पण प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

लाल सिंग चढ्ढा चित्रपटातील आमिर खान आणि करीना कपूर खान या दोन्ही कलाकारांवर वेगवेगळ्या कारणांमुळे टीका होत आहे. आमिर खानने काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे बॉयकॉट सध्या ती लाल सिंग चढ्ढा हा ट्रेंड चालू असताना करीना कपूरबाबत एक माहिती समोर आली. आणि तिच्यावरसुद्धा जोरदार टीका होत आहे. पण आता करीनानेच पुढाकार घेत ट्रोल करणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले आहे.

करिनावर टीका होण्याचं कारण म्हणजे ती बॉलिवूडमधील आगामी रामायणावर चादरीत असणाऱ्या चित्रपटात सीतेची भूमिका करणार अशी चर्चा सुरु होती. रिपोर्ट्सनुसार, करिनाला सीतेची भूमिका करण्याची ऑफर देण्यात आली होती पण तिने या भूमिकेसाठी 12 कोटी रुपयांची मागणी केली होती अशी माहिती समोर आली. त्यामुळेच करिनावर मोठ्या प्रमाणात टीकेला सुरुवात झाली होती. नेटकऱ्यांनी तिला हिंदूविरोधी म्हटले आहे.

आता करिनानं आपण खरचं सीतेची भूमिका करण्यासाठी बारा कोटींची मागणी केली होती का, या प्रश्नावर उत्तर दिले आहे.
तिने झूमला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मला तो चित्रपट कधीच ऑफर झाला नव्हता त्यामागचं कारण मला माहीत नाही. या चित्रपटासाठी माझी निवड कधी केली गेली नव्हती. तसेच ती टीकाकारांना उत्तर देत म्हणाली कि, ”लोकांना आम्हाला बोलायला दररोज काहीतरी विषय हवे असतात असे सुद्धा बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: