वर्षा राऊत यांना ईडी चौकशीसाठी समन्स मिळाल्यानंतर संजय राऊत म्हणतात की,

 

पत्राचाळ घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नीवर्षा राऊत यांची आज चौकशी करण्यात येणार आहे याबाबत संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी ‘येऊ द्या…सगळ्यांना येऊ द्या’ अशी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांची पत्नवर्षा राऊत यांची याआधी जानेवारी महिन्यात चौकशी करण्यात आली होती.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. आज सकाळी संजय राऊत यांना जे.जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा ईडी कार्यालयात त्यांना आणले. त्यावेळी पत्रकारांनी वर्षा राऊत यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले असल्याची विचारणा केली. त्यावर संजय राऊत यांनी, ‘आने दो…आने दो…सबको आने दो’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स बजावलं. याआधी जानेवारी महिन्यात वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. यावेळी ईडी अधिकाऱ्यांनी त्यांची जवळपास साडेतीन ते चार तास चौकशी केली होती. दरम्यान सध्या संजय राऊत अटकेत आहेत.
राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्या खात्यावरुन झालेल्या व्यवहाराबाबत राऊत माहिती देत नसल्याचा आरोप ईडीनं कोर्टात केला. ज्यांच्याशी व्यवहार झालाय त्यांना चौकशीसाठी बोलवणार असल्याचं ईडीनं पीएमएलए कोर्टाला सांगितलं.

Team Global News Marathi: