शिवसेनेतील बंडाबाबत अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट म्हणाले की,

 

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. शिवसेनेचं शिंदे गट आणि ठाकरे गट अशा दोन गटांमध्ये विभाजन झालं. शिवसेनेतील अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्यानं ठाकरे सरकार अल्पमतात आलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र यावर प्रतिक्रिया देताना आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठा खुलासा केला आहे. या गौप्यस्फोटानं पुन्हा एकदा राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं आहे.

अजित पवार म्हणाले की, शिवसेनेमध्ये जी फूट पडली ती फूट पडण्यापूर्वीच या सर्व गोष्टींची माहिती उद्धव ठाकरे यांना देण्यात आली होती. स्वत: पवारसाहेबांनी उद्धव ठाकरे यांच्या कानावर या सर्व गोष्टी घातल्या होत्या. पण पक्षनेतृत्वाने आपल्या आमदारांवर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि तिथेच खरी गफलत झाल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंना सावध केलं होतं पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की मी स्वत: याबाबत उद्धव ठाकरे यांना सावध केलं होतं.

पण त्यावेळी ते बोलले की, हा आमचा पक्षांतर्गत मामला आहे. मी बोलेल एकनाथ शिंदे यांच्याशी असं उत्तर त्यांनी दिलं, आणि शेवटी जे नको व्हायला हवं होतं तेच झालं. शिवसेनेमध्ये फूट पडल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. सत्यजित तांबेंवर प्रतिक्रिया दरम्यान यावेळी अजित पवार यांनी सत्यजित तांबे यांच्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. सत्यजीत यांना उमेदवारी द्या असं स्वत: पवार साहेबांनी मल्लिकार्जून खर्गेंना फोन करून सांगितलं होतं. पण त्यांनी त्यांच्या वडिलांना उमेदवारी दिली आणि तिथंच गडबड झाली असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Dail

Team Global News Marathi: