नारायण राणे भाजपचे पोपटलाल. ‘हे’ आरोप सिद्ध करा, संजय राऊतांचे आवाहन

 

नारायण राणे यांनी संजय राऊतणावर लगावलेल्या आरोपांना आता खासदार समजाऊ राऊत यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. नारायण राणे आणि किरीट सोमय्या हे भाजपचे पोपटलाल असल्यासारखं बोलतात, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. मात्र या नारायण राणे यांच्या आरोपांवरून संजय राऊत यांनी आता न्यायालइन भूमिका घेतली आहे. उठसूठ शिवसेनेवर बिनबुडाचे आरोप करतात. आता इनफ इज इनफ. यापुढे तथ्यहीन आरोप ऐकले जाणार नाहीत. आमच्यापैकी बहुतांश शिवसैनिक या सर्वांना कायदेशीर उत्तर देण्याच्या तयारीत आहेत.

नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात मी कायदेशीर नोटीस दिली आहे. त्यांनी एक तर माफी मागावी किंवा कोर्टात त्यांचं वक्तव्य सिद्ध करावं, असं आव्हान संजय राऊत यांनी दिलंय. नारायण राणेंविरोधात मानहानीचा दावा ठोकणाऱ्या संजय राऊत यांनी आज माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘ नारायण राणे, किरीट सोमय्या हे भाजपचे पोपटलाल आहेत. ते उठ सूठ शिवसेनेवर बिनबुडाचे आरोप करत असतात. तथ्यहिन विधानं करतात. तर आता पुरे म्हणण्याची वेळ आली आहे. कायदेशीर लढाई लढणार आहोत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

२००४ साली नारायण राणे यांनीच संजय राऊत यांना खासदार केलं. त्यावेळी त्यांचं नाव मतदार यादीत नव्हतं, असा दावा नारायण राणे यांनी केलाय. यावरून संजय राऊत यांनी आक्षेप घेतला आहे. तुम्ही मला खासदार केलं तर तेव्हा मग शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे काय करत होते? असा सवाल संजय राऊत यांनी केलाय. शिवसेना प्रमुख होते ते. बाळासाहेबांना शिवसना प्रमुख म्हणून मीच नेमलं, असंच म्हणायचं बाकी आहे. २००४ साली मी सामनाचा संपादक होतो. मतदार यादीत नाव नव्हतं म्हणतात. मी काय बांग्लादेशी की पाकिस्तानी नागरिक आहे का? भारताचा नागरिक आहे.

Team Global News Marathi: