शिवसेनेला टोमणे मेळाव्यासाठी परवानगी द्यावी, मनसे नेत्याने लगावला टोला

 

दसरा मेळाव्याचे मुद्द्यावरून शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात वाद सुरु असताना आता या वाढत मनसेने उडी घेत थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. शिवसेनेला टोमणे मेळाव्यासाठी परवानगी द्यावी, असे ट्वीट मनसेनेते गजानन काळे यांनी केले आहे. मनोरंजनापासून महाराष्ट्राला वंचित ठेवू नका, असे म्हणत गजानन काळे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

‘मुंबई मनपा व राज्यसरकारने शिल्लक सेनेला शिवतीर्थावर टोमणे मेळाव्यासाठी परवानगी देवून टाकावी. तसेच खंजीर, मर्द, मावळा, वाघनखं, गद्दार, निष्ठा यातून होणाऱ्या मनोरंजनापासून महाराष्ट्राला वंचित ठेवू नये. तसेही यावेळची स्क्रिप्ट बारामती वरून येणार आहे. अबू आझमी व ओवेसी स्टेजवर असणार आहेत का?’, असा प्रश्न गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे.

तर दसरा मेळाव्यावरुन राज्यात राजकारण चांगलच तापल आहे. शिंदे गट आणि मुळ शिवसेना दसरा मेळावा घेणार आहेत. शिंदे गटाला दसरा मेळावा घेण्यासाठी बीकेसी मैदान मिळाले. मात्र शिवसेनेच्या परवानगी अर्जावर अजूनही निर्णय घेण्यात आलेला नाहीये. दरम्यान शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे शिष्टमंडळ आज मुंबई पालिकेच्या जी नॉर्थ कार्यालयात जाणार आहे. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याबाबत निर्णय न झाल्यामुळे सेना आता आक्रमक झाली आहे.

Team Global News Marathi: