“भास्कर जाधवांचा मेंदू सडलेला, म्हणून त्यांचे विचारही सडलेले” रामदास कदमांची टीका

 

आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या टीकेला शिंदे गटात सामील झालेले रामदास कदम यांनी उत्तर दिलं आहे. “भास्कर जाधवांचा मेंदू सडलेला आहे. म्हणून त्यांचे विचारही सडलेले आहेत”, असं ते म्हणालेत. गद्दार जाधवांना उद्धव ठाकरे यांनी नेता केलं. उद्धवजींची निष्ठेची भाषा काय आहे आम्हाला माहिती आहे.

तसेच उद्धवजींना खुश करण्यासाठी मी रामदास कदम यांच्यावर टीका करू शकतो, हे दाखवण्याचा भास्कर जाधवांचा प्रयत्न आहे. त्यामुळे ते माझ्यावर टीका करत आहेत. रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांची तुलना भुंकणाऱ्या कुत्र्याशी केली आहे. आता या टीकेमुळे जाधव आणि कदम यांच्यातील वाद अधिक उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जाते.

काय म्हणाले भास्कर जाधव ?

शिवसेनेला कोणाचही शेपुट धरुन जावे लागत नाही. ज्या उदय सामंतांनी तुमच्या लेकाची वाट लावली आणि आता त्यांच्यासोबतच राहताय. २०१४ साली सूर्यकांत दळवी,अनंत गीते यांना पाडण्याच काम तुम्ही केलेत. तुम्ही पक्षविरोधी कारवाई केली होती, असे भास्कर जाधव यांनी म्हटले.

तसेच शपथा घेता पण एकेकाळी किशोर कानडे शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवत होते, तेव्हा तुम्ही केशवराव भोसले यांचे ड्रायव्हर म्हणून शिवसेनेविरोधात प्रचार करत होतात. ते साल होते १९८५ आणि तुम्ही निष्ठा सांगता १९७० च्या, पण १९८५ साली तुम्हाला शिवसेनाप्रमुखांनी पक्षातून काढून टाकले होते, असा दावाही भास्कर जाधव यांनी केला.

 

Team Global News Marathi: