शिवसेनेचं रक्त स्वस्त नाही हे, विरोधकांनी लक्षात घ्यावे

 

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा आपल्या खास शैलीत विरोधकांवर निशाणा साधला. २०२४पर्यंत पुन्हा महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल, असा दावाही केला. संजय राऊत यांचा आज वाढदिवस असून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेकांनी त्यांच्या घरी गर्दी केली. मात्र या गर्दीतून वाट काढत त्यांनी माध्यमांशी संवाद साधत टीकेचे बाण सोडले. तसेच उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अनेक नेत्यांनी शुभेच्छा दिल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, मी बाहेर असो वा नसो २०२४पर्यंत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल. सध्याच महाराष्ट्रातील राजकारण अस्थिर आहे. राजकारण पूर्णतः गढूळ झाले आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवले जात आहे. महाराष्ट्रातील जनता सर्व पाहत आहे. हे सर्व पाप यांना फेडावेच लागेल, असेही राऊत म्हणाले. आता रौत्यांच्या या टीकेमुळे पुन्हा एकदा शिंदे गट आणि ठाकरे गट असा वाद निर्माण होण्याचे चिन्ह दिसून येत आहे.

कल ठाण्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याबाबत पत्रकारांनी राऊतांना प्रश्न विचारला असता राऊतांनी शिवसैनिकाचे रक्त स्वस्त नाही, असे म्हणत विरोधकांना इशारा दिला. शिवसैनिकांवर हल्ले करणार असाल, शिवसैनिकाचे रक्त सांडवणार असाल तर, शिवसेनेचे रक्त स्वस्त नाही हे, विरोधकांनी लक्षात घ्यायला हवे, असा इशारा संजय राऊत यांनी विरोधकांना दिला.

Team Global News Marathi: