शिवसेना अन् सदा सरवणकरांच्या वादात आता नारायण राणे यांनी केले मोठे विधान

 

प्रभादेवीत शिवसेना आणि शिंदे गटात राडा झाला होता. यानंतर शिवसेनेकडून आमदार सदा सरवणकर यांच्यासह काही लोकांच्या विरोधात दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.आमदार सदा सरवणकर यांच्यावर गोळीबाराचा आरोप शिवसेनेने केला आहे. पोलिसांनी या आरोपांची चौकशी सुरू केल्याची माहिती आहे.

शिवसेनेकडून करण्यात आलेले आरोप सदा सरवणकर यांनी फेटाळले आहे. माझ्याकडे बंदुकीचा परवाना आहे. परंतु, मी गोळीबार केलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो म्हणून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असं सदा सरवणकर यांनी सांगितलं. तसेच परिस्थिती शांत करण्यासाठी आम्ही प्रभादेवी येथे गेलो होतो, असंही सदा सरवणकरांनी सांगितलं.

सदा सरवणकर आणि शिवसेना यांच्यातला वाद चिघळण्याची शक्यता असताना आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एन्ट्री घेतली आहे. नारायण राणे आज सदा सरवणकरांच्या भेटीसाठी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी दाखल झाले आहेत. सदर प्रकरण झाल्यानंतर दूसऱ्या दिवशीच नारायण राणे सदा सरवणकरांच्या घरी भेटीसाठी गेल्याने आता चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, मला कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी बदनामीला कामातून उत्तर देऊ. मी कामं करून आमदार झालो आहे, असं सदा सरवणकर म्हणाले. गणपती विजर्सनादिवशी जे झालं ते तेथेच संपलं होतं मग पुढे विषय वाढवायला नको होता. ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. सोशल मीडियाला सोशल मीडियावरूनच उत्तर द्यायचं असतं. घरी जाऊन मारहाण करणं योग्य नाही, असंही सदा सरवणकर यावेळी म्हणाले.

Team Global News Marathi: