शैलेश लोढाच्या जागी तारक मेहता का उल्टा चष्मा’ला मिळाला नवा ‘तारक मेहता’

 

तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे फॅन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेला अखेर नवा तारक मेहता मिळाला आहे. या मालिकेतून शैलेश लोढा यांचा पत्ता कट झाला असून त्यांच्याजागी एक नवा चेहरा तारक मेहता बनून मालिकेत एन्ट्री घेणार आहे.

शैलेश लोढा यांनी काही दिवसांपूर्वीच मालिका सोडली होती. या मालिकेत त्यांनी साकारलेलं तारक मेहता हे पात्र तुफान गाजलं होतं. पण त्यांनी अचानक मालिका सोडल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शोमधून हे पात्र गायब होतं.

मात्र प्रेक्षकांना तारक मेहताची कमतरता जाणवत असल्याने ते निराश होते. पण आता शोमध्ये तारक मेहता येणार आहेत. या भूमिकेसाठी अभिनेता सचिन श्रॉफ याचं नाव फायनल झालं आहे. सचिन श्रॉफने मालिकेचं शूटींगही सुरू केलं आहे. खुद्द ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माते असित मोदी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Team Global News Marathi: