शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर प्रवीण दरेकरांना म्हणाले यांना आताच गाडीत घ्या शिवबंधन बांधूया !

मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधकांनी सत्तधारी पक्षावर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. मात्र आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये असलेले खेळीमेळीचे वातावरण पुन्हा एकदा नजरेस पडले आहे. अशीच आज एक घटना घडलेली दिसून आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानभवनातून बाहेर पडत असतानाच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड आणि गिरीश महाजन यांनी त्यांची गाडी अडवली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही गाडी थांबवली. तसेच त्यांनी दिलेले निवेदन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा विधानभवनातून बाहेर पडत असताना विधानभवनाबाहेरच उभ्या असलेल्या प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि गिरीश महाजन या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही गाडी थांबवली. यावेळी या तिन्ही नेत्यांनी त्यांच्या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं. मुख्यमंत्र्यांनी हे निवेदन घेतलं. त्यावरून नजर फिरवली आणि विरोधकांशी मनमोकळ्या गप्पाही मारल्या. या चारही नेत्यांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा झाल्या.

यावेळी मागच्या गाडीत बसलेले शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर खाली उतरले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाडीजवळ आले. त्यानंतर मिलिंद नार्वेकरांनीही विरोधी पक्षनेत्यांशी गप्पा मारताना त्यांना चांगलाच टोला लगावला होता. नार्वेकर म्हणाले की, उद्धव साहेब, यांनी तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे का? यावंर दरेकर म्हणाले की, आम्ही केव्हाही येऊ शकतो.
तर नार्वेकर म्हणाले की, यांना आताच गाडीत घ्या, शिबबंधन बांधूया अशी कोपरखळी नार्वेकर यांनी दरेकरांना लगावली होती.

Team Global News Marathi: