शिवसेना आमदाराच्या कार्यालयाबाहेर संशयित कार, घातपाताच्या कटाचा संशय |

 

मुंबई | शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या अंधेरी येथील आमदार कार्यालयाबाहेर एक फटाक्यांनी भरलेली चारचाकी गाडी आढळून आल्यामुळे एकाच खळबळ उडाली होती. या मिळालेल्या स्फोटक गाडीमुळे स्वातंत्र्य दिनी मोठा घातपात घडवून आणण्याचा हा कट असावा असा संशय आमदार प्रकाश सुर्वे यांनी व्यक्त केला आहे.

तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही आमदार सुर्वे यांनी केली आहे. दरम्यान, गाडीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गाडी ताब्यात घेतली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. आमदार प्रकाश सुर्वे यांचं अंधेरीमध्ये कार्यालय आहे. या कार्यालयाबाहेर लाल रंगाची एक क्वॉलिस गाडी गेल्या चार-पाच दिवसांपासून उभी होती. त्यात मोठ्या प्रमाणात फटाके आढळून आले आहेत.

स्वातंत्र्य दिनी कार्यालयात झेंडावंदन केलं जातं. त्यावेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थी, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक तिरंग्याला सलामी देण्यासाठी येत असतात. उद्या कुणी या फटाक्यांना काडी लावली असती तर काय करायचं होतं? अशाप्रकारे फटाक्यांनी भरलेली गाडी आढळून आल्यानं घातपाताचा संशय वाटतोय. त्यामुळे पोलिसांनी याची चौकशी करावी, अशी मागणी आमदार प्रकाश सुर्वे यांनी केली आहे. या प्रकरणी सध्या पोलीस यंत्रणा तपस करत आहे.

Team Global News Marathi: