वाशिम शिवसेनेचा हायवे कॉन्ट्रॅक्ट घोटाळा गडकरींच्या पत्रामुळे उघड |

 

 

मुंबई | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या लेटर बॉम्बमुळे शिवसेना पक्षावर सर्व बाजुंनी जोरदार टीका होताना दिसून येत आहे. त्यातच आता वाशिम शिवसेनेचा नवा हायवे कॉन्ट्रॅक्ट घोटाळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्रामुळे उघड झाला आहे असा आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी केला आहे.

 

 

शिवसेनेच्या नियमबाह्य आणि दहशतीमुळे राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची कामे बंद पडतील असा इशारा नितीन गडकरींनी पत्रातून दिला आहे. शिवसेना आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींनी अधिकारी आणि कंत्राटदारांना भंडावून सोडलं आहे. नितीन गडकरींनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. गडकरींच्या स्फोटक पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

 

याच पत्रानंतर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा घणाघाती आरोप केला आहे.  सोमय्या यांनी एक व्हिडिओट्विट करून ते म्हणतात की, वाशिम शिवसेनेचा हायवे कॉन्ट्रॅक्ट घोटाळा नितीन गडकरीजींच्या पत्राद्वारे उघड झाला आहे. वाशिम शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या रु.१०० कोटींच्या घोटाळ्या विरोधात न्यालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. या प्रकरणात अधिक चौकशी करण्यासाठी मी शुक्रवार २० ऑगस्टला वाशिम येथे भेट देणार आहे असे ट्विट त्यांनी केले आहे.

 

Team Global News Marathi: