शिवसेना शहरप्रमुखांनी बॅनरवर छापला छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो

 

डोंबिवली | शिवजयंतीनिमित्त शिवसेना मध्यवर्ती शहर शाखेतर्फे सोमवारी लावलेल्या काही होर्डिंग्जची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु झाली आहे शिवसेनेने छापलेल्या बन्नेर्वे छत्रपती शिवाजी महाराजांऐवजी छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो छापल्याचे निदर्शनास येताच भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी शिवसेनेला लक्ष्य केले.

बाहेरच्या पक्षातून आलेल्या लोकांना शहरप्रमुख अशी महत्त्वाची पदे दिली की असा गोंधळ होतो. त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्याबाबत जरा लक्ष घालावे, असे आवाहन करून त्यांनी टीका केली. त्यावर मंगळवारी शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार चव्हाण यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. त्या बॅनरवर नजरचुकीने छत्रपती शिवाजी महाराजांऐवजी छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो लागला होता असे सांगितले.

पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, शहरप्रमुखपदी कोणाला बसवायचे हा शिवसेना पक्षाचा प्रश्न आहे. शिवसेनेने शिवजयंतीनिमित्त काढलेली न भूतो अशी मिरवणूक बघून त्यांच्या पायांखालची वाळू सरकली असावी. आमच्या रक्तात हिंदुत्व असून त्यांनी आम्हाला ते शिकवू नये, असेही ते म्हणाले. तसेच भाजपने कधी शिवजयंती साजरी केलेली आपण पाहिले नाही. बॅनर लावले नाही. त्यामुळे अशा पद्धतीने दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे.

Team Global News Marathi: