शिवसेना नेते रामदास कदम यांना कोरोनाची लागण, ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासनाच्या अडचणी वाढवताना दिसत आहे. त्यात सर्व सामान्य नागरिकांबरोबर राजकीय पुढाऱ्यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे.

त्यात आता शिवसेनेचे नेते रामदास कदम यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. रामदास कदम यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कदम यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली होती. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून कोणताही संशय मनात न ठेवता सर्वांनी लस घ्यावी असे आवाहनही कदम यांनी केले होते.

रामदास कदम यांनी काही दिवसांपूर्वीच करोना लस टोचून घेतली होती. त्यावेळी त्यांनी जनतेला करोना लशीबाबत असलेले गैरसमज दूर करण्याचे आवाहन केले होते. कोरोना प्रतिबंधक लस घेतली. कोरोना प्रतिबंधक लसीबद्दल अनेक लोकांच्या मनात गैरसमज असल्याचे दिसून येते, परंतु हे लसीकरण पूर्णतः सुरक्षित आहे. आपले आणि कुटुंबीयांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आपणही लवकरात लवकर लस घ्यावी ही विनंती ! असे ट्विट त्यांनी केले होते.

Team Global News Marathi: