लॉकडाऊनला राष्ट्रवादी पक्षाचा विरोध, वाचा कोणी केला मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर टीका

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासनाच्या अडचणी वाढवता दिसत आहे. त्याच पाश्वभूमीवर राज्यात सायंकाळी ८:०० ते सकाळी ७:०० पर्यंत संचार बंदी लागू करण्यात आली आहे. तसेच रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर कडक लॉकडाऊन करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

मात्र आता मुख्यमंत्र्यांनी दिलेली लॉकडाउनच्या इशाऱ्याला राष्ट्र्वादीने विरोध दर्शवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्याला आणि जनतेला लॉकडाउन परवडणारा नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इतर पर्यायांचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना नवाब मलिक म्हणाले की, “महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. एका दिवसात ४० हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. निश्चितच लॉकडाउन हे राज्याला, जनतेला कोणालाच परवडणारं नाही. आम्ही सर्वांनी मुख्यमंत्र्यांकडे लॉकडाउन हा पर्याय नसल्याचा आग्रह धरला आहे.

तसेच रुग्णसंख्या वाढत असल्याने त्यांनी प्रशासनाला लॉकडाउनची तयारी करण्यास सांगितलं आहे. पण याचा अर्थ लॉकडाउन अपरिहार्य आहे असं नाही. जर लोकांनी नियम पाळले तर लॉकडाउन टाळता येऊ शकतो”. सारे मलिक यांनी बोलून दाखविले आहे.

Team Global News Marathi: