शिर्डी देवस्थानाचे विश्वस्त राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी

 

शिर्डी देवस्थानाचे विश्वस्त राहुल कनाल यांच्या घरी आयकरची छापेमारी करण्यात आली आहे. राहुल कनाल यांच्या मुंबईतील घरी आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. यशवंत जाधव यांच्यापाठोपाठ शिवसेनेच्या आणखी एका जवळच्या नेत्याच्या घरी आयकर विभागानं धाडी टाकल्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. राहुल कनाल हे मंत्री आदित्य ठाकरे प्रमुख असलेल्या युवासेनेचे पदाधिकारी सुद्धा आहेत.

 

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय तसेच शिर्डी संस्थानाचे विश्वस्त राहुल कनाल हे सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहे. त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी छापेमारी सुरु आहे. आज आयकर विभागानं मुंबईत आणि पुण्यात छापेमारी सुरु केली आहे. ही छापेमारी कोणत्या प्रकरणाशी निगडीत आहे, हेकारण अद्याप समोर आलेले नाहीये.

राहुल कनाल पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. शिवसेना उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागानं काही दिवसांपूर्वी धाडी टाकल्या होत्या. जवळपास चार दिवस हे धाडसत्र सुरु होतं. अशातच आता शिवसेनेच्या आणखी एका नेता आयकर विभागाच्या रडारवर आहे.

Team Global News Marathi: