शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे प्रथमच ठाण्याला जाणार!

 

शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक सुरु झाली होती. अशातच आज पहिल्यांदाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात जाणार आहे. आनंदमठ या आनंद दिघे यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे भेट देणार आहेत. मात्र हे आनंदमठ आता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य कार्यालय आहे असं असताना उद्धव ठाकरे या कार्यालयात जातील का? असा सवाल निर्माण झाला आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तांतरानंतर पहिल्यांदाच ठाण्यात येणार आहेत. मात्र ते येण्याआधीच ठाण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. आज दुपारी ते टेंभी नाका येथील आनंदमठ या आनंद दिघे यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे भेट देणार आहेत. मात्र हे आनंदमठ आता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य कार्यालय आहे असं असताना उद्धव ठाकरे या कार्यालयात जातील का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

हाच मुद्दा उपस्थित करुन आता शिंदे आणि ठाकरे गट पुन्हा एकदा आमने सामने आले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण लक्षात घेता ठाण्यात पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे. असा आहे उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा उद्धव ठाकरे प्रजासत्ताक दिनी ठाण्यातील तलाव पाळी परिसरात वैद्यकीय शिबीराला भेट देणार आहेत, यानंतर उद्धव ठाकरे आनंद आश्रमात शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनाही श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.

Team Global News Marathi: