आपण आपल्या वडिलांसाठी काय केलं? उद्धव ठाकरे यांच्या ठाणे दौऱ्यापूर्वी शिंदे गटाने साधला निशाणा

 

आज पहिल्यांदाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात जाणार आहे. आनंदमठ या आनंद दिघे यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे भेट देणार आहेत. मात्र हे आनंदमठ आता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य कार्यालय आहे असं असताना उद्धव ठाकरे या कार्यालयात जातील का? असा सवाल निर्माण झाला आहे. अशातच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरून शिंदे गट आणि ठाकरे गट कायमच आमने-सामने येत असल्याचं पहायला मिळत आहे. आता या वादात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी उडी घेतली आहे. बाळासाहेब हे विश्ववंदनीय महापुरुष असून ते काही कोणाची खासगी मालमत्ता नाही असं म्हणत त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. नेमकं काय म्हणाले गायकवाड? शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.

बाळासाहेब ठाकरे काही कोणाची खासगी मालमत्ता नाही. ते विश्ववंदनीय महापुरुष आहेत. देशाचा महापुरुष हा कोण्या एकट्याचा नसतो. त्यामुळे कोणी कितीही ओरडले तरी कायदेशीरदृष्या कोणी काहीच करू शकत नाही. आपण आपल्या वडिलांसाठी काय केलं? आणि आमच्यासारख्या लोकांनी किती रक्त सांडलं हे पहावं. ‘बाळासाहेबांवर आमचा हक्क’ मावळेसोबत होते म्हणून बाळासाहेबांचे विचार देशभर पोहोचले. बाळासाहेब हे महापुरुष आहेत. त्यामुळे महापुरुष म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आमचा हक्क आहे. असा घणाघात संजय गायकवाड यांनी केला आहे.

Team Global News Marathi: