शिंदे गटाला आमची रणनीती समजली, उद्धव ठाकरे गटाचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

 

एकनाथ शिंदेंसह 50 आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. यानंतर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला अशातच आता उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहीलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. नाव आणि पक्षचिन्ह वाटपामध्ये विरुद्ध बाजूला झुकतं माप दिल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला गेला आहे.

या पत्रामध्ये 12 मुद्दे मांडत ठाकरे गटाने निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयात पक्षपातीपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पत्रातून आयोगाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग आमच्या पक्षासोबत भेदभाव करीत आहे, असं यात म्हटलं गेलं आहे केंद्रीय निवडणूक आयोग एकनाथ शिंदे गटाला प्राधान्य देत आहे. शिंदे गट निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतरही कागदपत्रं देत नाही.

मात्र, आम्ही दिलेली कागदपत्रं शिंदे गटाला दिली जातात. मात्र, त्यांची कागदपत्रे आम्हाला दिली जात नाही. आमची रणनीती तुम्ही उघड केली असा आरोप ठाकरे गटाने पत्रातून केला आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे पक्षाचं नाव आणि चिन्हासाठी दिलेले पर्याय जाणुनबुजून वेबसाईटवर टाकण्यात आले. यामुळे शिंदे गटाला आमची रणनीती समजली. अन्यथा दोन्ही दोन्ही बाजूंचे पर्याय सारखेच कसे होते? असा सवालही ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

Team Global News Marathi: