राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 14 October 2022
शुक्रवार.
तारीख 14.10.2022
शुभाशुभ विचार- 14 नंतर चांगला दिवस.
आज विशेष – सामान्य दिवस.
राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00.
दिशा शूल- पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र- रोहिणी 20.47 पर्यंत नंतर मृग.
आजची चांद्रारशी – वृषभ.
————————————–


मेष – शुभ रंग – राखाडी
आज खिशात पैसा खेळता असल्याने तुम्ही आनंदी व उत्साही असाल काही हवे हवे असे वाटणारे पाहुणे घरी पायधूळ झाडतील महत्त्वाच्या चर्चेत वाद टाळून सुसंवाद साधावा.

वृषभ – शुभ रंग – पिस्ता
आज स्वतःचेच खरे करण्याचा अट्टाहास नको, इतरांचेही ऐकून घेण्याची तयारी ठेवा. व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजू नये. आज तुम्ही गोडबोल्या मंडळींपासून दूरच रहा.

 

मिथुन – शुभ रंग – मोरपंखी (Today’s Horoscope 14 October 2022)
आज संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. दिवस आजचा खर्चाचा आहे. बचतीचा विचार सोडून द्या आज तुम्ही गरजे इतके आध्यात्मिकही व्हाल. वादविवाद मात्र टाळा.

कर्क – शुभ रंग – हिरवा
आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस जे जे चिंता तेथे होईल कमी श्रमात ही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे आज जिवलग मित्र तुमचा शब्द झेलतील.

 

सिंह – शुभ रंग – गुलाबी
आज तुम्ही भावनेपेक्षा कर्तव्याला जास्त प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात आज महत्त्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. कदाचित आज तुम्हाला कुटुंबीयांची नाराजी पतकरावी लागणार आहे.

कन्या – शुभ रंग – सोनेरी
आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश शंभर टक्के यश मिळेल. सजनांचा सहवास लागेल. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे भेट आखाल.

 

तूळ – शुभ रंग – आकाशी
कोणतीही धाडसाची कामे आज करू नका. स्वतःला जपा आज कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका विश्वासातील माणसाकडूनच एखादा विश्वासघात होऊ शकतो

वृश्चिक – शुभ रंग – पांढरा
कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने तुम्ही आज घराबाहेरही आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू शकाल. जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी एखादी कामगिरी आज तुमच्या हातून होईल.

 

धनु – शुभ रंग – जांभळा
कोणतीही गोष्ट सहज साध्य असणार नाही. आज तुमच्या प्रयत्नांना मात्र दैवाचे पाठबळ नक्की मिळेल. काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे.

मकर – शुभ रंग – मरून
हौशी मंडळी आज जीवाची मुंबई करतील. आज मनसोक्त स्वतःचे लाड पुरवण्यासाठी वेळ पैसा खर्च कराल. गूढशास्त्राच्या अभ्यासाकांना एखादी प्रचिती येईल.

 

कुंभ – शुभ रंग – केशरी
आज काही घरगुती प्रश्नात लक्ष घालणे तुम्हाला गरजेचे वाटेल. गृह उद्योग करणाऱ्या महिलांची आवक वाढेल. आज तुम्हाला मुलांच्या अभ्यासात लक्ष घालणे गरजेचे आहे.

मीन – शुभ रंग – चंदेरी
आज नोकरदारांना बढती बदली विषयी समाचार येऊ शकतात. मुले आज अभ्यासात चालढकल च करतील गृहिणींनी सासूबाईंकडून शाब्बासकीची अपेक्षा ठेऊ नये.

 

शुभम भवतु

श्री जयंत बाळकृष्ण कुलकर्णी
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)
फोन 9689165424

ग्लोबल न्युज नेटवर्क: