शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ, वाचा काय आहे प्रकरण !

 

मुंबई | अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ पुन्हा वाढ झाली आहे. मुंबईतील वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक आणि धमकावल्या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये नितीन बरई नावाच्या व्यक्तीने शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि काशिफ खानसोबत इतर काही लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार २०१४ मध्ये SFL FITNESS PVT LTD चा डायरेक्टर काशिफ खानने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा सोबत मिळून नितीन बरईला १ कोटी रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले होते. पण नंतर जेव्हा काही सुरळीत चालत नव्हतं तेव्हा नितीनने त्याचे पैसे परत मागितले. त्यानंतर त्याला धमकी देण्यात आली, असं त्यानं म्हटलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी कलम ४०६,४०९,४२०,५०६,३४,१२० (ब) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारकर्त्यानं म्हटलं आहे की, जुलै २०१४ पासून आतापर्यंत मेसर्स एसएफएल प्रायव्हेट कंपनीचे डायरेक्टर शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, काशिफ खान, दर्शित शाह आणि त्यांच्या अन्य काही सहकाऱ्यांनी त्यांची फसवणूक केली. बरई यांनी सांगितलं की, त्याला सांगण्यात आलं होतं की, जर त्यानं यांच्या कंपनीची फ्रंचायजी घेतली आणि पुण्याच्या कोरेगाव परिसरात स्पा आणि जीम सुरु केली तर खूप फायदा होईल.

बरई यांना यानंतर एक कोटी ५९ लाख २७ हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगितलं. हे पैसे आरोपींनी आपल्या फायद्यासाठी वापरला आणि ज्यावेळी बरई यांनी आपले पैसे परत मागितले त्यावेळी त्यांना धमकी देण्यात आली,

Team Global News Marathi: