आगीशी खेळ करू नका, भस्मसात व्हाल, संजय राऊत यांचा इशारा

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधक सतत महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना दिसून आले आहेत त्यातच आघाडीच्या नेत्याकडून सुद्धा या टीकेला सडेतोड प्रतिउत्तर वेळोवेळी देण्यात आले आहे. त्यातच आता महागाईच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

शंभर दिवसांत महागाई कमी करण्याच्या थापा मारून भाजपने मते मिळवली. मात्र, सत्तेवर येताच त्यांना सर्वसामान्यांचा विसर पडला. आता महागाईबद्दल प्रश्न विचारला की राज्यात जातीय तणाव निर्माण केला जातो. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचा वापर करून राज्यातील महाविकास आघाडीचे अस्थिर करण्याचे कारस्थान रचण्यात येत आहे. पण या कारस्थानाच्या छाताडावर पाय रोवून शिवसेना देश पादाक्रांत करेल. उगाच आगीशी खेळ करू नका, भस्मसात व्हाल, असा खणखणीत इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना दिला.

केंद्रातल्या सरकारला प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. वास्तवाबद्दल विचारले की यांचे बिनसते. महागाई, बेरोजगारी, शेती, शेतकरी, तरुण, आरोग्य अशा प्रश्नांवर विचारले की, लगेच जातीय तणावाच्या घटना घडू लागतात. हिंदुस्थान-पाकिस्तान, चीनची घुसखोरी, सर्जिकल स्ट्राईक, हिंदू-मुस्लिम असे चर्वितचर्वण सुरू होते. हिंमत असेल तर मोदी सरकारने महागाईवर बोलावे, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले.

Team Global News Marathi: