‘शरद पवार गेल्याची दुःखद बातमी आली अन्. खासदार अरविंद सावंत यांचे भावुक पत्र!

निष्ठावंत शिवसैनिक शरद पवार यांचं शुक्रवारी कोरोना संसर्ग आजाराने निधन झाले. शिवसेनेचे कार्यकर्ते शरद पवार हे ‘शिवसेना दैनंदिनी’ चे प्रणेते होते. त्यांच्या अचानक जाण्यानं शिवसेना कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे यासच सेनेचे मोठे मुलास झाले आहे. शिवसैनिक शरद पवार शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या जवळचे मानले जात होते. अरविंद सावंत यांनी शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक भावनिक पत्र लिहिलं आहे.

ते आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहितात की, शरदचा चटका लावणारा अस्त ! आमच्या लोकाधिकारचा एक तारा शरद पवार गेल्याची दुःखद बातमी आली आणि मी निःशब्द झालो. गेली अनेक वर्षे हा साहेबांचा कडवट शिवसैनिक लोकाधिकारच्या चळवळीत झोकून देऊन काम करत होता. पण शरद पवार आणि जी एस यांनी स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली आणि ती शिवसेना दैनंदिनीची, असं अरविंद सावंत यांनी पत्रात लिहिले आहे.

अलीकडच्या काळात माझ्या कार्यालयात अनेकदा येऊन गेला. शरद एकदा त्याच्या चिरंजीवाला घेऊन आला. म्हटलं काय काम आहे का? नाही साहेब, तुमचा फॅन आहे म्हणून घेऊन आलो. माझ्याकडून काही योग्य घडलं, किंवा चांगला प्रतिवाद करताना दूरदर्शन वर पहिले की त्याचा फोन आलाच. असा हा शरद.’, अशा शब्दात अरविंद सावंत यांनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे .
कोरोनात सारे कुटुंबच अडकले आहेत. पत्नी आणि तो एकाच हॉस्पिटलमध्ये होते. पण ती गेल्याचा मागमुसही त्याला नव्हता. काल परवा सेव्हन हिल हॉस्पिटलला गेलो होतो तेव्हा त्याचा मुलगा भेटला. मला वाटले आता शरद नक्की बरा होऊन घरी येईल. पण कसचं काय आणि अखेर आज तोही सोडून गेला तेही अक्षय तृतीयेला!, शिवसेनाप्रमुखांच्या एका निष्ठावंत शिवसैनिकांचा शरीररूपी क्षय झाला पण अक्षय स्मरणात राहील, असेही सावंत यांनी पत्रात म्हटले आहे.

Team Global News Marathi: