गंगा नदीत तरंगणारे मृतदेह नाजयेरियाचे कंगना राणावत हीचा नवा शोध

     सतत वादग्रस्त वक्तव्य करत आपल्या अडचणी वाढण्याचे काम करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत हिने आता गंगा नदीत तरंगणाऱ्या शवावरून एक धक्कदायक विधान केले आहे.  गंगेत वाहून येत असलेले मृतदेह हे भारतातील नसून ते नायजेरियाचे असल्याचा जावईशोध कंगनाने लावला आहे. कंगनाच्या या अजब विधानावर आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे. तसेच या विधानावरून नेटकऱ्यांनी तिच्यावर जोरदार टीका केली आहे.
      कंगना राणावत हिचे ट्विटर अकाऊंट काही दिवसांपूर्वी बॅन करण्यात आल्याने ती इन्स्टाग्रामवर सक्रिय झाली आहे. नुकतीच तिने चाहत्यांना ईद आणि अक्षय तृतियाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. तसेच सर्वांनी एकत्र राहून कोरोनाविरुद्धची लढाई लढण्याचं आवाहनही केलं आहे. तिने इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यातून तिने हे आवाहन केलं आहे. मात्र उत्तरप्रदेशाचा चाहते नायजेरियाशी जोडलेल्या संबंधामुळे अनेकांनी तिच्या विधानावर आश्चर्य व्यक्त केले आहे.
           पुढे ते म्हणते की, इस्रायलप्रमाणे प्रत्येक विद्यार्थाला आर्मीत सेवा देणं बंधनकारक करावं. आम्हीही करू. तसेच आपल्याच धर्माचे लोक आपले आहेत, असं ज्याही धर्मात म्हटलं आहे. त्यांची पुस्तके हटवण्यात यावीत, अशी मागणीही तिने केली आहे. तुम्ही हिंदू असो की मुसलमान. शीख असो की ख्रिश्चन असो. आपल्या सर्वांचा एकच धर्म असावा. तो म्हणजे भारतीयता. तुमच्याकडे माणुसकी असायला हवी. आपण एकमेकांची कदर केली तर सर्व मिळून पुढे जाऊ, असंही तिने सांगितले आहे.
Team Global News Marathi: