शाहरुख खान ठरला फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराचा मानकरी

 

अभिनेता शाहरुख खान आजही अनेक कारणांसाठी चर्चेत असतो. यावेळी शाहरूख एका हायप्रोफाईल पार्टीमुळे चर्चेत आला आहे. अलीकडे शाहरूखनने त्याच्या मुंबईतील ‘मन्नत’ या बंगल्य़ावर काही देशांच्या राजदूतांसाठी एका हाय प्रोफाईल पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये फ्रान्स, कॅनडा आणि अन्य काही देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. सोशल मीडियावर या ग्रँड पार्टीतील अनेक फोटो व्हायरल होत आहे. ज्यात शाहरुख त्याच्या घरी आलेल्या पाहुण्यांचा योग्य पाहुणचार करताना दिसतोय. तसेच त्यांच्यासोबत अनेक फोटो देखील काढताना दिसतोय.

कॅनडाचे भारतातील राजदूत Diedrah Kelly यांनी या पार्टीचे अनेक फोटो ट्विटवर शेअर केले आहेत. यावेळी Kelly यांनी मन्नतवर झालेल्या स्वागताचे तोंड भरून कौतुक केले आहे. यावर kelly यांनी लिहिले की, जगभरातील चाहत्यांना शाहरूख किती आवडतो याची मला जाणीव आहे. दरम्यान आमचं मन्नतवर प्रेमाने स्वागत केल्याबद्दल गौरी खान आणि शाहरुख खानचे मनापासून आभार. मला बॉलिवूड आणि कॅनडा फिल्म इंडस्ट्रीचा अभिमान आहे.. या इंडस्ट्रीमध्ये नवीन संधी निर्माण होतील अशी पेक्षा व्यक्त करते.

 

तर फ्रान्सचे भारतीय राजदूत जीन-मार्क सेरे-शार्लेट यांनीही शाहरुखसोबतचे फोटो शेअर केले. त्यांनी फोटो शेअर करत लिहिले की, “मुंबईमध्ये झालेल्या एका पार्टीमध्ये फ्रान्समधील प्रतिष्ठीत असा नागरी सन्मान the Légion d’Honneur, यासाठी बॉलिवूडमधील शाहरुख खान अगदी योग्य आहे. शाहरुखनं दिलेल्या पार्टीसाठी त्याचे मनापासून आभार!’ शाहरुखला हा सन्मान त्याने संपूर्ण जगामध्ये सांस्कृतिक विविधतेसाठी दिलेल्या योगदानासाठी दिला गेला. तुमच्या आदरातिथ्याबद्दल मी तुमचे मनापासून कौतुक करू इच्छितो.

Team Global News Marathi: