कतरिनाला विकीच्या बोल्ड फोटोवर नेटकऱ्यांनी केला कमेंटचा भडीमार

 

मागचं वर्ष बॉलिवूडकरांसाठी फारच गोड ठरला असून असंख्य चर्चा आणि व्हायरल होणाऱ्या बातम्यांमध्येच विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांनी लग्न केल्याचं जाहीर केलं. त्यांचे फोटोही सर्वांनी पाहिले आणि नकळतच या जोडीला जवळचं मानत सर्वांनीच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. विकी आणि कतरिना पाहता बाहता बॉलिवूडचं Power Couple झालं.

तसंच कामाच्या व्यापातूनही ही जोडी सातत्यानं एकमेकांसाठी वेळ काढताना दिसली. कुठे फिरण्यासाठी असो किंवा मग एखाद्या कार्यक्रमासाठी, पार्टीसाठी असो. विकी तिथे कतरिना हेच चित्र पाहायला मिळालं. या दोघांचे एकत्र फोटो व्हायरल होत असतानाच आता कतरिनानं पुन्हा एकदा पतीसोबतचा सर्वात रोमँटिक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तिनं त्यासाठी लिहिलेलं कॅप्शनही तितकंच खास आहे.

Me and Mine… असं कॅप्शन तिनं या फोटोसाठी लिहिलं. फोटोमध्ये विकी आणि कतरिना एका स्विमिंग पूलमध्ये दिसत आहेत. इथं कतरिनानं विकीला घट्ट मिठी मारली आहे. हे पाहता तिला काही विकीचा मोह आवरत नाहीये, असंच दिसतंय. सिझलिंग केमिस्ट्री असणारा विकी- कॅटचा हा फोटो पाहिल्यानंतर फॉलोअर्स आणि नेटकरीही त्यावर व्यक्त झाले आहेत.

Team Global News Marathi: