“शाहरूखच्या पुत्राच्या कृत्याचे ढोल बडवताना मीडिया मात्र.. पुन्हा राऊतांच्या मोदी मीडियावर घणाघाती टीका

 

एनसीबीने रविवारी कारवाई करत कोर्डेलिया क्रूझवर केलेल्या छापेमारी प्रकरणात अनेकांना अटक केली होती या अटकेमध्ये अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचा सुद्धा समावेश आहे. हा मुद्धा मीडियाने चांगलाच उचलून धरला होता. मात्र दुसरीकडे उत्तरप्रदेशात लखमीपुर येथे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने ६ शेतकऱ्यांना चिरडले होते या घडलेल्या घटनेकडे मात्र कानाडोळा केला होतायाच मुद्द्यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

उत्तर प्रदेशच्या मंत्रीपुत्राने ४ शेतकरी चिरडून मारले. पण यापेक्षाही या मंडळीला शाहरूखच्या पोराचे प्रताप महत्वाचे वाटतात, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मीडियावर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांच्या हत्या, शेतकऱ्यांचं रक्त यापेक्षाही श्रीमंतांच्या पोरांची अंमली पदार्थांची व्यसनं आणि थेरं कुणाला महत्वाची वाटत असतील तर ‘जय जवान, जय किसान’चे नारे कशासाठी द्यायचे? बंद करा ती थेरं, अशा कठोर शब्दात राऊतांनी प्रसारमाध्यमांना सुनावलं आहे.

एकीकडे ड्रग्ज प्रकरणात शाहरूख खानच्या मुलाला झालेली अटक तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील लखमपूर खेरी येथे शेतकरी आंदोलनादरम्यान घडलेला हिंसाचार हे दोन्ही मुद्दे गाजत आहेत. पण ‘उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारलं गेलं. यावर आवाज उठवण्याऐवजी मीडिया आर्यन खानच्या पाठीमागे धावला. इतकं मोठं मृत्यूकांड झालं पण मीडिया मात्र शाहरूखच्या पोराने १३ ग्रॅम ड्रग्ज घेतल्याच्या बातम्यांचा पाठलाग करत आहे,’ असा आरोपही संजय राऊतांनी केला आहे.

Team Global News Marathi: