देगलूर पोट निवडणुकीत काँग्रेसने दिली जितेश अंतापूरकरांना उमेदवारी

 

कोरोनामुळे काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या देगलूर मतदारसंघात पोट निवडणूक जाहीर झाली आहे. ३० ऑक्टोबरला ही निवडणूक होणार आहे. त्यातच भाजपाने मोठी खेळी केली असून शिवसेनेचे माजी आमदार आणि गेल्या वेळचे पराभूत उमेदवार सुभाष साबणे यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने नुकतीच जितेश अंतापूरकरांची उमेदवारी जाहीर केली आहे.

पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का देण्यात आला होता. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढली होती. तरी देखील भाजपाच्या उमेदवाराचा विजय झाला होता. विद्यमान आमदार, खासदाराचे निधन झाले तर त्याच्या पत्नीला, मुलाला किंवा मुलीला उमेदवारी देण्यात येते. विरोधी पक्ष आणि मतदारांची देखील सहानुभूमी मिळविण्याचा तो एक प्रघात असतो. परंतू पंढरपूरमध्ये भाजपाने उमेदवारी देऊन विजय खेचून आणला होता. तसाच दगाफटका या पोटनिवडणुकीत होणार की काय असा प्रश्न राजकीय धुरिणांना पडला आहे.

तर दुसरीकडे भाजपने शिवसेनेला मोठा धक्का देत सेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी नरसी नायगावमध्ये दाखल झाले होते. देवेंद्र फडणवीस आणि सुभाष साबणे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली त्यानंतर त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती

Team Global News Marathi: