संजय राऊत म्हणाले, कोण राणे माहित नाहीत, आमचे शाखा प्रमुख किंवा आमदार यावर बोलतील

 

 

कोण नारायण राणे? यावर मला माहित नाही. आमचे शाखा प्रमुख किंवा आमदार यावर बोलतील. अतिशय स्थानिक विषय हा आहे, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेवर भाष्य केलं. मुंबईत पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी यावर भाष्य केले होते.

 

नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. या यात्रेदरम्यान त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर शिवसैनिकांनी स्मृतीस्थळावर जाऊन गोमूत्र शिंपडून ती जागा पुन्हा ‘पवित्र’ केली. यावरून राजकारण चांगलेच तापू लागले होते, यावरून सेवना आणि भाजपा आमने-सामने उभी राहिली होती.

 

तसेच आज होणाऱ्या सोनिया गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीवर भाष्य करताना राऊत म्हणाले की,देशातील मुख्य विरोधीपक्षाच्या नेत्यांची बैठक आहे. जे पक्ष राज्य स्तरावर विरोधी पक्षात काम करत आहेत, त्या मुख्यमंत्र्यांची आज बैठक आहे. देशापुढे अनेक प्रश्न आहेत. पेगॅसस ते महागाई यासारख्या अनेक विषयावर चर्चा होणार आहे. या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, झारखंड,केरळ ,छत्तीसगडचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. आज 4 वाजता ही बैठक आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Team Global News Marathi: