गिरीशभाऊ.सब घोडे बारा टक्के नसतात काँग्रेसने लगावला टोला

 

जळगाव | काही दिवसांपूर्वी माजी मंत्री आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांनी सुनील झंवर हे माझ्यासह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे निकटवर्तीय आहेत. असे वक्तव्य केले होते. विशेष म्हणजे या वक्तव्याचे कोणत्याही राजकीय पक्षाने खंडन केले नव्हते. परंतु, आता काँग्रेसचे प्रदेश सचिव डी. जी. पाटील यांनी महाजन यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला असून जोरदार टोला लगावला आहे.

पाटील म्हणाले की, गिरीशभाऊ… सब घोडे बारा टक्के नसतात’ असा टोला लगावला आहे. तर महाजन यांनी यापुढे फक्त स्वतः किंवा त्यांच्या पक्षापुरते मर्यादित बोलावे, असा सल्लाही त्यांनी दिला.बीएचआरप्रकरणी मुख्य संशयित सुनील झंवर यास नुकतीच अटक केली. तसेच झंवरच्या कार्यालयात अनेक राजकीय नेत्यांशी संबंधित कागदपत्रे सापडल्याची चर्चा आहे.

दरम्यान, झंवरला अटक झाल्यानंतर झंवर हे माझ्यासह सर्वच नेत्यांचे निकटवर्तीय आहेत, कुणी नाही म्हणून दाखवावं…असे वक्तव्य आमदार गिरीश महाजन यांनी केले होते. यावर आक्षेप घेत काँग्रेसचे प्रदेश सचिव डी. जी. पाटील यांनी महाजन यांच्या वक्तव्याचा समाचार घेत, झंवरशी ज्याचे संबंध आहे ते कबूल करतील. परंतु, घोटाळ्यातील संशयितासोबत विनाकारण इतर राजकीय पक्षाचे जोडू नये. खासकरून काँग्रेसच्या बाबतीत तर बोलूच नये, असा सल्ला पाटील यांनी दिला आहे.

Team Global News Marathi: