सांगली-कोल्हापुरातील पुराचं पाणी मराठवाड्याकडे वळवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

 

पाण्याचा कायमच प्रश्न असलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी एक आंनदाची बातमी आहे. आता सागंली आणि कोल्हापुरातील पुरातील पाण्याचा योग्य वापर होणार असून हे पाणी मराठवाड्यात वळवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सांगली आणि कोल्हापुरातील जिल्ह्यात वारंवार पूर येतो. त्यांच्या पाण्याचा पुराचे पाणी मराठवाड्यात वळवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

पाणीवाटपाचा कायदा पुराच्या पाण्याला लागू होत नाही, म्हणून हे सांगली कोल्हापुरातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यात येणार आहे. बोगदे तयार करून हे पाणी मराठवाड्यात नेण्यात येणार आहे. या प्रकल्पाला निधी देण्यासाठी जागतिक बँकेनेही सहमती दर्शवली आहे.

तसेच जे पाणी समुद्रात वाहून जाते आणि जे पाणी आपण वापरू शकत नाही ते पाणी गोदावरी नदीत सोडण्याचा निर्णय सरकारने अगोदरच घेतला होता. पण हे काम काही दिवसांपासून रखडले होते. हा प्रकल्प परत सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे मराठवाड्यासाठी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Team Global News Marathi: