‘एक-दोन लोक पळून गेले म्हणजे शिवसेना संपत नाही, हे कृत्रिम वादळ’ – संजय राऊत

 

शिवसेना नेते संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत बंडखोर आमदार आणि भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. एक, दोन लोक पळून गेले म्हणजे शिवसेना संपली असं म्हणता येणार नाही. शिवसेनेत झालेली बंडखोरी हे कृत्रिम वादळ आहे, ही वावटळ लवकरच दूर होईल. शिवसेना पुन्हा एकदा नव्या दमाने उभी राहील, असा दावा राऊत यांनी केला आहे. ‘धनुष्यबाण’ चिन्ह उद्धव ठाकरे की शिंदे गटाकडे जाणार?

संजय राऊतांनी केलं मोठं विधान पुन्हा एकदा शिवसेना नव्या जोमाने कामाला लागली आहे आणि लवकरच ती खूप पुढे गेलेली दिसेल, असंही राऊत म्हणाले. दरम्यान नाशिकमधील नगरसेवक आपल्यासोबतच असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यांच्या बैठकीला अर्ध्याहून अधिक नगरसेवक गैरहजर होते. मात्र सगळे नगरसेवक सकाळी मला भेटले.

काहींना कार्यक्रमांना तर काहींना लग्नाला जायचं होतं. त्यामुळे ते आले नाहीत, असं राऊत म्हणाले. यासोबतच शिंदे गटात गेलेले आता नगरसेवक नाहीत. ठाणे, नवी मुंबईत आमचेच नगरसेवक येतील. शिवसेना अजूनही भक्कम आहे. नाशिकमध्ये भगवाच फडकणार. नाशिक नेहमी बाळासाहेबांच्या पाठिशी राहीलं आहे. आजही नाशिक शिवसेनेसोबत आहे, असा दावाही त्यांनी केला.

Team Global News Marathi: