समीर वानखेडेंना अटक होण्याची शक्यता, शरद पवारांशी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची चर्चा !

 

मुंबई | एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना कोणत्याही क्षणी अटक करण्यात येणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात मंगळवारी तासभर चर्चा झाली. या चर्चेत याविषयावरची चर्चा झाल्याचं सांगितल्या जात आहे. दरम्यान वानखेडे यांच्यावर अटकेची कारवाई केल्यास राज्य आणि केंद्रातील संबंध मात्र ताणले जाणार आहेत.

समीर वानखेडे केंद्राच्या सेवेत आहेत. मात्र त्यांच्याविषयी मुंबई पोलिसांकडे ४ तक्रारी आहेत. विशेष करून आर्यन खान अटकप्रकरणी १८ कोटींची लाच मागितल्याचा गंभीर आरोप आहे. राज्य सरकारने याप्रकरणी चार सदस्यांचे विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त केले आहे. समीर वानखेडे यांनी मध्यंतरी उच्च न्यायालयात धाव घेऊन राज्य सरकारच्या एसआयटी स्थापनेला विरोध केला होता.

शरद पवार आणि गृहमंत्री वळसे यांच्या ‘सिल्व्हर ओक’ येथील भेटीदरम्यान मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे उपस्थित होते. मुंबई पोलिसांनी नेमलेल्या एसआयटीचे नेतृत्व एसीपी मिलिंद खेतले करत आहेत. ड्रग्ज प्रकरणी मुंबई पोलिसांची एसआयटी वसुली प्रकरणाचा तपास करत आहे. माध्यमाला सांगितल्याप्रमाणे एसआयटीला अद्याप तपासात समीर वानखेडे किंवा एनसीबीच्या कोणत्याही अधिकाऱ्याचा सहभाग आढळून आलेला नाही, दरम्यान अजून तपास सुरू आहे.

 

Team Global News Marathi: