टिकटॉक स्टार समीर गायकवाड याची राहत्या घरी आत्महत्या

टिकटॉक स्टार समीर गायकवाड याने राहत्या घरी पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. या घटनेमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घरात कोणीही नसताना समीरने आत्महत्या केली आहे.

समीर गायकवाड पुण्याच्या वाघोलीतील केसनंद रस्त्यावरील मिकासा सोसायटीतीत आपल्या कुटुंबासोबत राहतो. त्याने घरात गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मात्र अद्याप त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. त्याचा चुलत भाऊ प्रफुल्ल गायकवाड याने पोलीस स्थनाकामध्ये फिर्याद नोंदवली आहे.

पोलिसांनी तात्काळ माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली होती. तसेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. समीरने आत्महत्या का केली, याचे कारण स्पष्ट झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Team Global News Marathi: